कोविड केअर सेंटरसाठी ५० पीपीई किट उपलब्ध

0

 चोपडा – चोपडा शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढती आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे व्हावे यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना चोपडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी ५० पीपीई किट उपलब्ध करून दिले.

चोपडा तालुक्यात कोरोनाचे पहिले रुग्ण अडावद येथे सापडले होते. यानंतर चोपडा शहरात देखील रुग्ण आढळले. दरम्यान, शहर व तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. बाधितांवर उपचार देखील सुरू आहेत. अशा वेळी कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ५० पीपीई किटे दिले.

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांनी हे किट स्वीकारले. यावेळी पालकमंत्र्यांनी डॉक्टरांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी चोपड्याच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे, पालिकेतील गटनेते जीवन चौधरी, एम.व्ही.पाटील, आबा देशमुख, राजाराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.