कोल्हापूरच्या महापौर सुरमंजिरी लाटकर यांचा राजीनामा

0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी राजीनामा दिला आहे. पक्षातंर्गत फॉर्म्युल्यानुसार महापौर अॅड. लाटकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यानुसार त्यांनी आज महापालिकेच्या विशेष सभेत राजीनामा दिला. अवघ्या सव्वादोन महिन्यात सुरमंजिरी लाटकर पदावरुन पायउतार झाल्या आहेत. खांदेपालट होऊन कोल्हापूरचे महापौरपद आता काँग्रेसकडे जाणार आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुरमंजिरी लाटकर यांची सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 19 जानेवारी 2019 रोजी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली होती. लाटकर या कोल्हापूरच्या 49 व्या महापौर होत्या. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाआघाडी करत पहिला विजय कोल्हापुरात मिळवला होता. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून इथे आघाडी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.