ठाकरे सरकार ७० हजार रिक्त पदे भरणार ; कोणत्या विभागात किती जागांची भरती?

0

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात घोषणा केलेल्या ७० हजार रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या जागा भरण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील बेरोजगारांसाठी ही मेगाभरती सुवर्णसंधी असणार आहे.

ग्रामविकास, गृह, कृषी, पशू व दुग्धसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आणि आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्‍त पदे आहेत. त्यामुळे तातडीने महाभरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. त्यानुसार आता ठाकरे सरकार ही भरती प्रक्रिया सुरु करणार आहे.

कोणत्या विभागात किती जागांची भरती?
ग्रामविकास : 11000
गृह विभाग : 7111
कृषी विभाग : 2500
पशु व दुग्ध संवर्धन विभाग : 1047
सार्वजनिक बांधकाम : 8330
जलसंपदा : 8220
जलसंधारण 2433
नगरविकास : 1500
आरोग्य : 10,560

Leave A Reply

Your email address will not be published.