कोरोना लसीबाबत दिलासादायक बातमी; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ‘ही’ लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी

0

नवी दिल्ली – जगभरात करोनाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे दिलासादायक बातमी समोर आली आहे. फायझर आणि बायोटेकने विकसित केलेली करोना व्हायरस लस 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीच्या वतीने सोमवारी करण्यात आला आहे.

प्राथमिक अभ्यासानुसार लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांत आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांतच सुरक्षा मिळते. फायझरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला म्हणाले, आमच्या करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलच्या सुरुवातीच्या परिणामांवरून ही लस किती सुरक्षित आहे आणि करोनापासून किती सुरक्षा देऊ शकते, याचा पुरावा मिळाला आहे. जगाला लस पुरवण्यासाठी आम्ही आता जवळ पोहोचलो आहेत.

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला जाणार आहे. 2020 मध्येच लशीचे 50 दशलक्ष आणि 2021 मध्ये 1.3 अब्ज डोस जगाला पुरवू अशी आशा आहे, असे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे जगातील ही पहिली लस आहे, ज्या लशीची चाचणी लहान मुलांवरदेखील करण्यात आली आहे.

दरम्यान, जगभरात करोनाबाधित रुग्णांची संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी “जॉन हॉपकिन्स’च्या अहवालानुसार, रविवारी जगातील करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढून 5.2 कोटींच्या पार गेले आहेत. तसेच 12 लाखांहून अधिक रुग्णंचा मृत्यू झाला आहे. “जॉन हॉपकिन्स’च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक 98 लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 2 लाख 37 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.