कोरोना काळात दुध व्यावसायिकांना मदत केल्याने पदाधिकार्‍यांचा सत्कार

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात शासनातर्फे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. सर्वच दुकाने व व्यवसाय बंद करण्यात आले होते. दूध विक्री हा व्यवसाय शेतकऱ्यांशी संबंधित व जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडतो म्हणून दूध व्यवसाय हा सुरू राहावा सर्वा ना घराघरात दूध हे आवश्यक असते.  लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत चहा, चहा, कॉफी आणि दुधापासून इतर वस्तू या आवश्यक असतात. शासनाने दूध विक्री वर ही बंदी आणली होती.

दूध विक्री सुरू राहावी याकरिता चोपडा येथील सर्वच दूध व्यवसायिक पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास भाई गुजराथी व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याकडे गेले असता आम्ही जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडतो म्हणून आमचा व्यवसाय सुरू राहावा आम्हाला मदत करा अशी आर्त हाक घेऊन गेले असता लगेच त्यांच्यासाठी चंद्रहास गुजराथी यांनी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांना विनंती केली. की दिवसातून काही तासाकरीता का असेना यांना व्यवसाय करू द्या जीवनावश्यक सेवेमध्ये दूध विक्री हा व्यवसाय मोडतो. म्हणून यांना व्यवसाय करू द्या असं सांगितले असता अवतार सिंग चव्हान यांनी सुद्धा काही तासासाठी यांना मुभा दिली होती.

याच गोष्टीच ऋण फेडण्यासाठी गुजराथी वाडी येथे सर्व चोपडा तालुक्यातील दूध व्यवसायिक यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, यांनी आपल्या मनोगतात अस म्हटले की, जगात आईला आणि गाईला सारखेच महत्व प्राप्त आहे, गाय वाचली पाहिजे, गिर गाईचे महत्व काय असते हे देखील  त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर माजी आमदार कैलास बापू पाटील, गिरीश आप्पा पाटील, भूपेंद्र गुजराथी, इंदिराताई पाटील, भारती बोरसे, चंद्रहास भाई गुजराथी, प्रकाश रजाळे, अजगर दादा, बापू डेअरीचे संचालक बापू महाजन, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी दूध व्यवसायिक पंडित आप्पा गवळी, प्रल्हाद पाटील, भूषण शांताराम भालेराव, प्रभु चांरण, भगवान पाटील, देवेंद्र पाटील, अशोक पाटील, विजय पाटील, राहुल महाजन, शिवा भिवा चांरण, राजू भरवाड़, आबिद शेख, मोहीत अग्रवाल, जयेश बड़गुजर, रितेश डीसा, यांच्या वतीने सत्कार आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.