कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, वाचा 24 तासातील आकडेवारी

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 29 हजार 942 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 3 हजार 876 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. दरम्यान, देशात 24 तासात  3,56,082 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. परवाच्या तुलनेत (3 लाख 66 हजार 161) नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटल्याने पुन्हा दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 29 हजार 942 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 876 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 49 हजार 992 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 37 लाख 15 हजार 221 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 27 लाख 10 हजार 66 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.