कोठलीतील शाळे समोरील झाडामुळे अपघाताला निमंत्रण

0

भडगाव :- शहरातील कोठली रोड येथील आदर्श कन्या शाळे समोरील नाल्यात झाडे,झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लागतात त्यामुळे कोठली कडून येणाऱ्या वाहनांना पारोळ्या कडून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे वारंवार लहान मोठे अपघात होऊन वादविवाद होत असतात तसेच शाळा वळणावर असल्यामुळे लहान मुलांचा वापर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शाळा सुटल्यावर पळत सुटतात. समोर येणाऱ्या वाहनांना नाल्यात वाढलेल्या झाडामुळे काहीच दिसत नसल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो नाल्यातील घाण लवकरात लवकर साफ करावी. शाळे जवळील सुकलेले झाड तोडावे तसेच शाळा सुटण्याच्या वेळेवर वाहतुक पोलीस यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांन कडून होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.