कर्नाटक : कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

0

बंगळुरु : कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा वाजूभाई वाला यांच्याकडे सोपवला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार आणि  रेवन्ना उपस्थित होते. दरम्यान, उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार कोसळले. त्यानंतर कुमारस्वामी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात कुमारस्वामी सरकारला ९९ मते मिळाली, तर भाजपच्या बाजूने १०५ मते मिळाली.कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी हा जनतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचारी आणि अपवित्र आघाडी सरकारचा अंत झाला आहे. आम्ही तुम्हाला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ. आम्ही मिळून कर्नाटकला समृद्ध बनविणार आहोत. आता राज्यात विकास एक नवे पर्व सुरू होईल, असे ते म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.