कृउबा समितीच्या भिंतप्रकरण; शासकीय मालमत्तेचे नुकसान, तरीही गुन्हा नाही

0

जळगाव :- कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत पाडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित विकासकावर बाजार समिती सभापतींनी अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल केला नाही? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? या सर्व प्रकारात सभापतींना जाब विचारण्याऐवजी संचालक मंडळ मूग गिळून का गप्प बसले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय मालमत्तेचे कुणी नुकसान केले, तर त्याच्यावर लागलीच गुन्हा दाखल केला जातो. याप्रकरणी आता तर बाजार समिती सभापतींनी कानावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.बाजार समितीचे पालकत्त्व सभापती आणि संचालक मंडळावर असते.

समितीच्या मालमत्तेचे नुकसान केले जात असताना हे सर्वजण काय करत होते? सभापतींनी पुढाकार घेऊन भिंत तोडणार्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल का केला नाही, सभापतींनी बाजार समितीमधील व्यापारी, शेतकरीवर्ग यांची दिशाभूल केली असल्यास त्यांच्यावर अविश्वास आणून पदावरून हकालपट्टी करण्याचे धाडस आताचे संचालक मंडळ का दाखवत नाही? हे संचालक कुणाच्या दबावापुढे झुकले आहेत? बाजार समितीत बेकायदा कामे घडत असतील, समितीच्या संपत्तीचे नुकसान होत असेल तर समिती सचिव, जिल्हा उपनिबंधक, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी आपले उत्तरदायित्त्व व जबाबदारी नेमकी कशा पध्दतीने निभावली? आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.