जळगावात बोगस कर्ज व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चार कर्मचारी निलंबित

0

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळातील प्रकार

जळगाव – येथील महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळातील बीज भांडवल योजने अंतर्गत बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी जिल्हा व्यवस्थापकसह तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  दरम्यान या प्रकरणातील ७०२ फाईल सिल करण्यात अली असून व्यवस्थापकसह तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगाव येथिल महाबळ परीसरातील असलेले महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ कार्यालया कडून सन 2012 ते जानेवारी 2019 कालावधी मधील बीज भांडवल योजने अंतर्गत बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार केला होता. या प्रकरणी जळगाव कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक लोहोकरे,यांच्यासह कर्मचारी अडकमोल,नवले,मगरे असे चार जणांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  या बोगस प्रकरणातील कर्ज प्रकरणाच्या ७०२ फाईल वरिष्ठ कार्यालय, मुंबई यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणी प्राथमिक स्वरूपात दोषी धरण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.