कुटुंब अर्थ सहाय्य योजनेत १९ लाभार्थ्यांना आ. किशोर पाटील यांचे हस्ते धनादेशाचे वाटप

0

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनांतर्गत पीडित १९ लाभार्थी महिलांना पाचोरा – भडगाव तालुक्याचे आ. किशोर पाटील यांच्याहस्ते तहसिलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत तहसिलदार यांचे दालनात धनादेश वाटप करण्यात आले.

कुटुंबातील कर्त्याव्यक्तिंचे नैसर्गीक आपत्तीत किंवा अन्य काही कारणामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तींचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा मयत व्यक्तिंच्या कुटुंबीयाच्या वारसांना शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत दारिद्रय रेषेखालील (बी.पी.एल.) लाभ धारकांना अर्थसहाय्य केले जाते. त्या अनुषगांने मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांनी प्रत्येकी २० हजार रुपयाप्रमाणे १९ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. यात मनिषा कोळी (सारोळा बु”), यशोदाबाई बागुल (सारोळा खु”), वंदनाबाई पाटील (वाडी शेवाळे), अनिता खेडकर (पाचोरा), रेखाबाई पाटील (गाळण बु”), सविता पाटील (नांद्रा), अनिता तांबे (शिंदाड), सुनिता पाटील (खाजोळा), अनिता नेरपगार (सामनेर), रेखा पाटील (वडगांव कडे), सरला पवार (चिंचपुरे), संगीता परदेशी (डांभुर्णी), समीना तडवी (सावखेडा खु”), कविता पवार (पाचोरा), सुनिता पाटील (दहिगांव संत), हिराबाई चव्हाण (पाचोरा), मायाबाई सोनवणे (टाकळी ), भारती पाटील (पाचोरा), मंगला देवरे (पाचोरा) या महिलांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, संगांयो नायब तहसिलदार मुकेश हिवाळे, निवासी नायब तहसिलदार अमित भोईटे, अव्वल कारकून रेखा साळुंखे, लिपिक सीमा पाटील, हेमंत जडे, शिवसेना तालुकाध्यक्ष शरद पाटील, अरूण पाटील, चंद्रकांत धनावडे, स्विय सहायक राजेश पाटील, कार्यालयीन सहाय्यक नाना वाघ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.