कुंझरकर हे स्वतःहून ‘त्या’ रात्री घराबाहेर गेले ; तपास अधिकारी तुषार देवरेंची माहिती

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  किशोर पाटील कुंझरकर त्यारात्री भल्या पहाटे 3 वाजे चे सुमारास स्वतःहून घराबाहेर गेले त्यांना कुठल्याही अज्ञात इसमाने मोबाईलवर फोन करून घरा बाहेर बोलावले नव्हते असा खुलासा एरंडोल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक या गुन्ह्यातील तपास अधिकारी तुषार देवरे यांनी केला आहे.

 

त्यांचा मोबाईल रात्री आठ वाजे पासूनच “स्विच ऑफ” होता. ते घरातून पाई चालत गेले त्यांना अज्ञात आरोपींनी प्रथम मारहाण करून नंतर त्यांना पळासदळ शिवारात आणून टाकले त्यांचा खून करणे हा उद्देश अज्ञात मारेकऱ्यांचा नसावा असा अंदाज देवरे यांनी व्यक्त केला मारहाण करतेवेळी झालेल्या झटापटीत कुंझरकर यांना  डोक्यात  दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

तपासाची चक्रे याप्रकरणी वेगाने  फिरविण्यात येत असून  अज्ञात मारेकऱ्यांच्या  मुसक्या लवकरच बांधण्यात येतील व  त्यांना गजाआड केले जाईल असा दृढ विश्वास तपास अधिकारी देवरे यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान याप्रकरणी 11 डिसेंबर शुक्रवार रोजी संघटना विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक बंधू-भगिनींनी संयुक्तिक निवेदन पोलीस निरीक्षक जाधव यांना देऊन  कुंझरकर यांच्या संशयास्पद मृत्यू बाबत जलदगतीने तपास करावा त्यांच्या पत्नी मुले व कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदन देताना तालुका मुख्याध्यापक  संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुषण पाटील राकेश पाटील रवींद्र लाळगे, बी वाय पाटील ,रवींद्र कोळी, गोविंदा वंजारी, प्रवीण चव्हाण, प्रमोद सोनवणे, वसीम शेख, नारायण पाटील, लक्ष्‍मण कोळी, बीएम बोरसे, राहुल निकम, शेख फरीद शेख याकूब अनिल पाटील, पवार भाऊसाहेब पवार,  महेंद्र पाटील, भाईदास पाटील, आर झेड पाटील, मराठी एम के मराठे, यांचेसह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.