ओझर,टाकळी गावालगत होत असलेल्या मलशुद्धीकरण केंद्र इतरत्र हलविण्यात यावे

0

चाळीसगाव – चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने तीतूर नदीकिनारी असलेल्या सुवर्णाताई नगर जवळील भूमापन क्रमांक ९ वरील एक हेक्टर जागेवर  मलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे, सदर जागा ही शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा तसेच ओझर गावालगत येत असल्याकारणाने आरक्षित ठिकाणी होत असलेल्या मलशुद्धीकरण केंद्रामूळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे यात अनेक आजारांना आमंत्रण दिले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने आरोग्याविषयक प्रश्न निर्माण होऊ शकतो.

ही बाब लक्षात घेता परिसरातील ग्रामस्थांनी याविषयक हरकत नोंदविली असून या आशयाचे निवेदन आज मुख्याधिकारी शंकर गोरे यांना देण्यात आले

 

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, भगवान पवार, विनोद गुजर, चंद्रकांत महाजन, शरद महाजन, राकेश ठाकूर, विकास सोनवणे, रवींद्र महाजन, विनीत गवळी, भूषण महाजन, आकाश सोनवणे, पपु गवळी, मंगेश तांबे आदी ग्रामस्थांच्या वतीने मुख्याधिका-यांना निवेदन देण्यात येऊन व्यथा मांडण्यात आली

Leave A Reply

Your email address will not be published.