कळमसरे ग्रामपंचायती मार्फत कुपोषित बालकांना औषधींचे वाटप

0

अमळनेर (प्रतिनिधी):-कळमसरे गावातील तीन अंगणवाड्या मधील चार बालके कुपोषित आढळून आले होते.तरी त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कळमसरे यांच्यावतीने ग्रामपंचायतीच्या निधीतून चारही बालकांना कुपोषण मुक्तीच्या औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी चारही बालकांचे पालक उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री एस डी सोनवणे,माजी सदस्य पिंटू भाऊ राजपूत,आबा महाजन तसेच धनराज न्हावी ,गोकुळ न्हावी, भागवत कोळी तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.