शिवलीला पाटील बिग बॉसमधून बाहेर..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘बिग बाॅस मराठी 3’ हा मराठमोळा शो आठवड्याभरापासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर याचाच बोलबाला पहायला मिळत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर वाद-विवाद, चर्चा होणारचं. अशातच या वादग्रस्त शोमधून शिवलीला पाटीलची एक्झीट झाली आहे.

https://www.instagram.com/p/CUaZUlHqAai/?utm_source=ig_web_copy_link

शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. त्यामुळे बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे काही दिवस व्होटिंग लाईन्स बंद राहणार आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर ती पुन्हा एकदा बिग बाॅसच्या घरात दिसणार आहे.

शिवलीला प्रसिद्ध कीर्तनकार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. कीर्तन करण्याची त्यांची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असलेल्या पहायला मिळतात.

दरम्यान, शिवलीला बाहेर जाणार म्हटल्यावर अनेकांचा चेहरा आता उतरला आहे. आता पुन्हा कधी त्यांचं पुनरागमन होईल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.