काळ्या पैशांसदर्भात सीबीआयचे देशभरातील ५१ कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

0

नवी दिल्ली – सीबीआयने देशभरातील 51 व्यक्‍ती किंवा संस्थांच्या विरोधात काळ्या पैशांसदर्भात गुन्हे दाखल केले आहेत. 2014-15 या कालावधीमध्ये हॉंगकॉंगमध्ये 1,038 कोटी रुपये हस्तांतरित करण्यासंदर्भाने हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या 51 संस्थांपैकी बहुतेक चेन्नईतील रहिवाशांच्या मालकीच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून 1,038 कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम हॉंगकॉंगमध्ये हस्तांतरित केले असल्याचा आरोप आहे. बॅंक ऑफ इंडिया, एसबीआय आणि पंजाब नॅशनल बॅंकेच्या माध्यमातून ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुमारे 48 चालू कंपन्यांच्या 51 चालू खाती या बॅंकांच्या चार शाखांमध्ये उघडण्यात आली असून ही खाती केवळ परदेशात पैसा हस्तांतरित करण्यासाठीच उघडण्यात आली असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. यापैकी 24 खत्यांद्वारे परदेशात पैसा पाठवला जात असे. या मार्गे 488.38 कोटी डॉलरच्या समतुल्य रक्कम परदेशात पाठवली गेली. ही रक्कम आयात मालाच्या आगाऊ रक्कम म्हणून दाखवले गेले. तर 27 खात्यांच्या माध्यमातून 549.95 कोटी रुपये भारतीय प्रवाशांच्या विदेशातील प्रवासासाठी पाठवण्यात आले होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.