काँग्रेस नेते अशोक चव्हाण कोरोना पॉझीटिव्ह

0

मुंबई ː काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. त्यांना करोनाची लागण झाल्या असल्याच्या वृत्ताला मुंबईतील कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

अशोक चव्हाण हे गेल्याच आठवडय़ात मुंबईहून नांदेडला गेले होते. मुंबईतून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली करोना चाचणीही करुन घेतली होती. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता संसर्ग झाल्याचं निषन्न झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.