नाथजोगी समाजाच्या जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी विनोद जोगी

0

अमळनेर (प्रतिनिधी):– नाथजोगी  समाजाचे  विनोद तुकाराम राउळ(जोगी)  यांची अखिल भारतीय  नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे.  सदरची निवड ही युवा पिढीला दिशा देणारी आहे.

विनोद राऊळ हे विविध संस्था व सामाजिक कार्याचा अनुभव असलेले  व्यक्तिमत्व असुन अमळनेर नाथ जोगी समाज  संघटना उपाध्यक्ष  शिव वाहतुक सेना शहर अध्यक्ष या पदांवर कार्यरत आहे.  अपंगत्व व जात बाजूला ठेवून आंतरजातीय विवाह पदवीधर मुकबधिर हर्षाली हीचा विवाह मल्लखांब खेळाडूशी घडवुन समाजापुढे आदर्श ठेवला आहे त्यांच्या या कार्याची दखल आणि घरातील समाजसेवेचे बाळकडू यामुळे पोहोचलेला कार्यकर्त्याचा पिंड ओळखून त्यांच्यावर महासंघाने ही जबाबदारी सोपवली असल्याचे नाथ जोगी संघटनेचे राज्य प्रवक्ते विश्वनाथ डवरी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.