काँग्रेसच्या संजय वराडे व अरुणा पाटील यांची हकालपट्टी

0

जळगांव. –

नेहमीच चर्चेत वादग्रस्त वक्तव्य वर्तन करणार्‍या काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष अरूणा पाटील व जळगांव तालुकाध्यक्ष संजय वराडे यां दोघा पदाधिकार्‍यांची हकालपट्टी जळगांव प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी केली आहे.
काँग्रेस महिला शहराध्यक्ष अरूणा पाटील यांनी काही दिवसापूर्वी पक्षविरोधात काँग्रेस भवन प्रागंणामध्ये दुकाने भाडेतत्त्वावर दिल्याने जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांच्या विरोधात भीक मांगो अंदोलन केले होते तसेच त्यांच्या या कृत्याबद्दल पक्षाची बदनामी झाल्यामुळे पक्षाने त्यांना पदभार मुक्त करण्यात आले होते त्यामुळे त्यांनी रागाचा भरात सरचिटणीस अजबराव पाटील यांचावर ऑईल फेकून त्यांच्यावर प्राणघात हल्ला केला होता . तसेच दोन तालुकाध्यक्षांच्या वादात काही महिन्यापासून काँग्रेस कमिटी कार्यालयाला संजय वराडे यांनी कुलूप लावले होते त्यादिवसापासून नवनिर्वाचित मनोज चौधरी तसेच काँग्रेस कार्यालयामधून त्यांना वारंवार नोटीस देऊन ही त्यांनी दखल न घेतल्याने त्यांनी पक्षविरोधी, पक्षहिताला बाधा पोहचेल असे वर्तन केल्याने जळगांवचे प्रदेश प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी या दोघा पदाधिकार्‍याना पक्षादेश येईपर्यत निलंबित करण्यात येत असल्याचे पत्राव्दारा म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.