कलेक्लोरेट वरील उपोषणार्थींची प्रकृती खालविल्याने दोघे रूग्णालयात

0

जळगांव  :-
अवैधरित्या वाळू साठा करणार्‍या वाळु माफियांची चौकशी न केल्याने भ्रष्टाचार निर्मुलन जनहीत (भारत) संघाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.त्यापैकी जेष्ठ ना. अध्यक्ष रामदास चिंधू बावस्कर व कडू
नारायण बावस्कर या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगांव येथील वाघूर नदीच्या पात्रातून विदावूट रॉयल्टीने हजारो ब्रास वाळू काढून भुसावळ तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या आशिर्वादाने साकेगाव येथे पाण्याच्या टाकीजवळील रेल्वे ब्रिज, स्मशानभूमी तिघे्र खिर्डी दिपनगर हायवे गावर कंपनीच्या व गोंभी येथील आयुश कंपनीच्या कामासाठी त्यांच्या प्रोजेक्टच्या शेडमध्ये हजारो ब्रास अवैध वाळूसाठा करून ठेवलेली आहे. या बाबत भ्रष्टाचार निमुर्लन जनहीत संघाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज देवून व व्हिडीओ पुराव्यांसह प्रत्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सर्व प्रकार निदर्शनास आणूनही आजपावेतो कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने व निवेदन देवूनही दखल न घेतल्याने 3 जाने. पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघातर्फे उपोषण पुकारण्यात आले आहे.उपोषणाच्या तिसर्‍यादिवशी दोघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना जिल्हारूग्णालयात हलविण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांमध्ये अध्यक्ष उत्तमराव काशिराम साळुंखे, ता. सचिव प्रशांत अशोक पाटील, महा. सचिव संतोष संभाजी लोणे, सदस्य अशोक वासुदेव सुरवाडे, तालकाध्यक्षा आशाबाई रमेश पाटील, महासचिव पौर्णिमा विठ्ठ्ल फेगडे सहभागी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.