पत्रकारीता आणि आव्हाने

0

6 जानेवारी 1812 ला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि 6 जानेवारी 1832 साली त्यांनी मराठीतले- दर्पण- नावाचे पहिले वृत्तपत्र सुरू केले. जांभेकरांचा जन्मदिवस आणि त्यांनी सुरू केलेले दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र सुरू केलेले दर्पण 6 जानेवारी हा योगायोग असून तो दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. देश पारतंत्र्यात असतांना मुंबईच्या एल्स्फिस्टन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे काम ते करायचे. परंतु तेवढ्याने समाधानी नव्हते. महाविद्यालयापुरते प्रबोधन सिमित न राहता मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रबोधन झाले पाहिजे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून त्यांनी दर्पण हे मराठीत वृत्तपत्र सुरू केले.महाराष्ट्रातील मराठी वाचकांचे त्याव्दारे प्रबोधन व्हायचे;परंतु शासन पातळीवर जनतेच्या कोणत्या समस्या आहेत. ते शासनाला कळाले पाहिजे म्हणून ब्रिटिश धार्जिण्या सत्ताधार्‍यांना कळावे म्हणून दर्पण मधील मराठी मजकुरात एक कॉलम इंग्रजी भाषेतून द्यायचे. आपला देश पारतंत्र्यात असतांना आपल्या देशाविषयी असलेला जांभेकरांचा जाज्वल्य स्वाभिमान महत्वाचा म्हटला पाहिजे. बाळशास्त्री जांभेकर यांचे आयुष्य अवघे 36 वर्षाचे. या 36 वर्षाच्या कलावधीत वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी दर्पण सुरू केले. दर्पण साडेआठवर्षे चालविले. त्यानंतर 1940 साली त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केले. बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे ते सदस्य बनले. त्यानंतर वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले.एवढ्या कमी कालावधीत बाळशास्त्री जांभेकर यांनी जो ठसा उमटवला ते कायम स्वरूपी स्मरणीय राहणारे आहे. आगामी पत्रकारितेला मार्गदर्शन देणारी त्यांची अल्प कारकीर्द म्हटली पाहिजे. म्हणूनच बाळशास्त्री यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
आजच्या पत्रकारदिनी बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करून पत्रकारिते पुढे असलेली आव्हाने लिलया पेलण्यासाठी प्रयत्न केले गेले. तरच बाळशस्त्रीजींचा जन्मदिवस साजरा करायला अर्थ प्राप्त होणार आहे. ज्या काळात मुद्रणाची कसलीही सोय नसतांना, ब्रिटिश राजवटीचे भूत डोक्यावर असतांना आपल्या देशातील जनतेचे प्रबोधन करण्यासाठी दर्पण सुरू केले. ती ध्येयवादी पत्रकारिता आज कुठे आहे याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे आपल्या देशातील पत्रकारिता तीन भागात म्हणजे स्वातंत्र्या नंतरची पत्रकारिता असे तीन भाग केले तर स्वातंत्र्यापूर्वकाळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारिता ध्येयवादी राहिला नसून पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. पूर्वी पत्रकारिता व्यवसायातून पैसे कमावणे हे ध्येय नव्हते परंतु आजची पत्रकारिता पूर्णपणे व्यावसायिक बनली आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख त्या जाणार्‍या आपल्या देशातील पत्रकारितेत तीन भागात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वकाळातील पत्रकारितापेक्षा आमच्या पत्रकारितेपुढे फार मोठी आव्हाने उभी राहिलेली आहे. आजची पत्रकारिता धयेयवादी राहिला नसून पूर्णपणे व्यापारीकरण झाले आहे. पूर्वी पत्रकारिता व्यवसायातून पैसे कमावलो हे ध्येय नव्हते परंतु आजची पत्रकारिता पूर्णपणे व्यावसायिक बनली आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख पत्रकारितेची आजची स्थिती स्पर्धात्मक बनली आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत प्रसारमाध्यमाची साधने अत्यल्प होती आज संगणकाचा जमाना असल्याने माहितीचा महापूर एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
1980 ते 1990 च्या दशकात दूर दर्शन ह्या प्रसार माध्यमांनी धूम केली आहे. दूर दर्शनपुढे मुद्रित पत्रकारिता टिकणार की नाही , अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण दूरदर्शन चॅनेलचे क्रेज निर्माण झाले होते.90 ते 90 हे दर्शक दूादर्शन प्रसार माध्यमाने गाजवले. परंतु विश्वासार्हतेच्या कसोटीवर दूरदर्शन प्रसारमाध्यम तग धरून शकले नाही. दूरदर्शनची क्रेझ जरी असली तर विश्वासहर्ता मुद्रित वृत्तपत्रातील आहे. त्यामुळे हळू हळू जनतेचा वृत्तपत्राकडेच वळला. आज स्पर्धेत मुद्रित वृत्तपत्रे बाजी मारताहेत हेही तितकेच खरे. त्यामुळे टीव्ही चॅनेलचे आव्हान मुद्रित वृत्तपत्रे आणि त्यातील पत्रकारांना कायम राहणार आहे. आज सर्वसामान्य छोटी वृत्तपत्रांची स्थिती कसोटीची असून मोठ्या वृत्तपत्रांसमोर त्याचा टिकाव लागणे कठीण झाले आहे. त्यासाठी चोट्या वृत्तपत्रांना आपली वेगळी चुल निर्माण स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करावी लागणार आहे. संगणकावर जाऊन नेटव्दारे वृत्तपत्रातील ठराविक बातम्या पहाण्याची सवय दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या वृत्तपत्राचा खप मोठ्या वृत्तपत्राच्या तुलनेत कमी असल्याने त्यांनाजाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही तोकडे आहे. तरीसुध्दा आपले स्वतंत्र आपले स्वतंत्र वेगळे अस्तीत्व ध्येय घेऊन वाटचाल केल्यास छोट्या वृत्तपत्राचेही वाईट दिवस संपतील.

Leave A Reply

Your email address will not be published.