कर्नाटकात भाविकांच्या कारला अपघात : १३ ठार, 4 जखमी

0

बेंगळुरू: कर्नाटकमध्ये दोन भरधाव कार एकमेकींना धडकून झालेल्या भीषण अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात 1 वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. बंगळुरु- मंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


तामिळनाडूतील होसुरू मार्गाने ट्रेवेरा येथील यात्रेला हे भाविक गेले होते. तेथून परतत असताना भाविकांच्या कारला अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक देतात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून ही कार पलिकडून जात असलेल्या कारवर जोराने धडकली. या भीषण अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातात भाविकांच्या कारचा चुराडा झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.