येस बॅंकेवरील निर्बंधांमुळे शेअर बाजार गडगडला !

0

मुंबई : करोना व्हायरसमुळे आधीच शेअर बाजारावर विपरित परिणाम होत असताना, आता येस बॅंकेवरील निर्बंधांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल ११०० अंकानी गडगडला आहे. डॉलरची किंमत 74 रुपये झालं आहे. तर निफ्टी 381 अंकांनी कोसळली आहे. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले असून खातेदारांना आता ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

करोना व्हायरसमुळे आर्थिक प्रगतीला खीळ बसल्याने आधीच शेअर बाजारामध्ये निरुत्साह आहे. त्यात आता येस बॅंकेवरील निर्बंधांची भर पडली आहे. येस बॅंकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने आरबीआयकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बॅंकांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसत नाहीय. आज सेन्सेक्स 1 हजार 67 अंकांनी घसरून 37, 404 अंकानवर आहे तर निफ्टी 325 निर्देशांकांनी घसली असून 10, 944 अंकांवर आहे. येस बँकेचे शेअर्स तब्बल 25 टक्क्यांनी घसल्याचं पाहायला मिळत आहे. तर एसबीआयच्या शेअरमध्ये सात टक्‍क्‍यांनी घसरण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.