करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

0

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता पार्टीच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. करोनाशी लढताना केलेल्या चांगल्या प्रयत्नांचे जगभर कौतुक होत असल्याचेही मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेले ५ आग्रह

१)गरिबांना जितके जमेल तितके रेशन द्या.

२)आपल्यासह ५ इतर लोकांना मास्क द्यावेत.

३) देशाची सेवा करणाऱ्या लोकांना धन्यवाद द्या. यात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस, बँक-पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

४)आरोग्य सेतू ऍप अधिकाधिक लोकांच्या ऍपमध्ये डाउनलोड करवून घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याने कमितकमी ४० लोकांच्या फोनमध्ये हे ऍप डाउनलोड करण्यास सांगावे.

५)युद्धाच्या काळात लोक देशाला नेहमीच दान देत आले आहेत. करोनाविरुद्धची लढाई ही देखील मानवतेसाठी लढाई आहे, असे समजून पीएम केअर फंडात दान द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.