जळगाव : मृत्यू झालेल्या दोघाही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

0

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता.

या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह इतर 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. यानंतर जिल्हा रूग्णालयात दोन रूग्ण दाखल झाले होते. त्यांचे सँपल घेण्यात आले होते, मात्र रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशातच दोन दिवसापूर्वी या दोघ संशयित रुग्णांचा रात्री उशीरा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे महाधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांनी रूग्णालयात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना संशयित म्हणून दाखल केले होते या माहितीला दुजोरा दिला. तथापि, या दोघांचे स्वॅप सँपल पाठविण्यात आले असून याचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे याबाबत आजच विधान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या दोन्ही रूग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला. यात चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने हे दोन्ही रूग्ण कोरोनाच्या संसर्गामुळे न दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक रूग्ण ही ६५ वर्षांची महिला होती. तिचा मृत्यू उच्च रक्तदाबाने झाला आहे. तर दुसरा ३३ वर्षे वयाचा रूग्ण हा अल्कोहोलीक सिंड्रोममुळे मृत्युमुखी पडल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन्ही रूग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.