मनूरच्या ग्रामसेवकास तहसिलदारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस !

0

बोदवड (प्रतिनिधी) : – तालुक्यातील मनूर बु येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक कृष्णा मधुकर वराडे हे गावात कोरोना विषाणू बाबत जनजागृती व उपाययोजना करण्यात असहकार्य करीत असल्याची तक्रार मनूर बु येथील कोरोना जनजागृती समितीचे प्रभारी अध्यक्ष महेंद्र निवृत्ती पाटील यांनी तहसिलदार रविंद्र जोगी यांच्याकडे केली होती.या तक्रारीची दखल घेत तहसिलदार श्री.जोगी यांनी ग्रामसेवक श्री.वराडे यांना आपणाविरुध्द फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करून आपले बडतर्फीचा प्रस्ताव का सादर करण्यात येवू नये? याबाबत आपला लेखी खुलासा दोन दिवसांत सादर करावा अशा स्वरुपाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मनूर बु येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री.वराडे मुख्यालयी हजर राहत नसून गावात कोरोना विषाणूबाबत जनजागृती व उपाययोजना करण्यात असहकार्य करीत आहेत.गेल्या २२ मार्च पासून गावात फिनाईल, सोडिअम हायड्रोक्लोराईडची फवारणी नियमित सूरू असून फवारणीसाठी लागत असलेले साहित्य उधारीने आणले आहे.कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी १४ वित्त आयोग निधीतून खर्च करण्यात यावा असे शासनाचे आदेश असतांना व मागील फवारणी औषधांचे देयक अदा केले नसल्याने व त्यामुळे पुढिल फवारणी नियमित केली जाणार नाही याकडे संबधित ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत अशी गावहितासाठीची तक्रार श्री.पाटील यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता या तक्रारीची गंभीर दखल घेत नैसर्गिक आपत्तीत ग्रामसेवक श्री.वराडे यांनी कामकाजाकडे दुर्लक्ष केले असून तसेच कर्तव्यात परायणता राखत नसल्याचे स्पष्ट होत आहे.सदरची बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून आपण शासकीय कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्य परायणता राखलेली नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आपणा विरूध्द उचित स्वरुपाची कारवाई का करू नये ?अशी तंबी तहसिलदार यांनी संबधित ग्रामसेवक यांना बजावण्यात आलेल्या नोटीसात दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.