कजगाव जिप शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

0

कजगांव : येथील जि.प.प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळावा उद्घाटन कजगांवच्या सरपंचा सौ. वैशाली दिनेश पाटील यांनी फित कापून केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश महादू पाटील, कजगांव भाग शिक्षणविस्तार अधिकारी गणेश भास्करराव पाटील, केंद्रप्रमुख कोमलसिंग पाटील, मुख्याध्यापिका लताताई पाटील, सुनिल महाजन, भारत मिस्तरी, अमोल जगताप, माधव पाटील, पत्रकार बांधव उपस्थित होते.मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ३० प्रकारचे विविध पदार्थांचे स्टोल लावले होते.

या बालआनंद मेळाव्यातून बालकांना मिळणा-या आनंदाचं शब्दांत वर्णन करता येणार नाही. आज वस्तू घेणार्या मुलाच्या हातात पैसे होते.जे पदार्थ आवडतात ते त्यांनी खरेदीही केले.ज्या विद्यार्थ्यांनी पदार्थांचे स्टॊल लावले होते व वस्तू विक्री केल्या त्यांनी पैसे मोजून जपून ठेवले.स्वकमाई / खरी कमाईचे महत्व मुलांना समजले. ह्यातून मुले दैंनदिन व्यावहारीक ज्ञानाच्या खूप गोष्टी शिकले.गणिताचे ज्ञान,समतोल व सकस आहाराचे महत्व,पदार्थ निर्मिती मागची पार्श्वभूमी,सणावारांना केले जाणारे पदार्थ -त्यांची पाककृती,विज्ञानाचे ज्ञान,शब्दसंपत्ती वाढते त्यामुळे जगण्यास उपयोगी पडेल अशा जीवन कौशल्यांची अशा सहशालेय उपक्रमांतून रुजवणूक झाली तरच भविष्यात आजचे विद्यार्थी तरु शकतील.हाच ह्या उपक्रमागील उद्देश आहे. आज या उपक्रमातून मुलांनी स्वतःची कमाई केली.ह्या स्वत: कमावलेल्या पैशांचं मोल काही औरच असेल!विशेष म्हणजे आज कार्यक्रमाविषयीच्या पालक , गावकरी, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया खूपच बोलक्या व आनंदी होत्या.सर्व प्रकारच्या पदार्थांची ह्या वेळेस रेलचेल होती.

ईडली,आप्पे,मठाची ऊसळ,भाजलेल्या शेंगा,उकडलेल्या शेंगा,कचोरी,समोसे,फालुदा,गुलाबजाम,मुंग भजे,बटाटाभजी,केळी जे,खमंग,भेळभत्ता,पाणीपुरी,खारे शेंगदाणे,रगडा,पपई,गोड बोर,सोयाबीन चिली,केळी वेफर्स,डोसाइ.अनेक पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही तर नवल !!!

याप्रसंगी कन्या शाळा व परीसरातील इतर शिक्षक,पालक, महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मालीनी पाटील यांनी केले. बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी कजगांव शाळेच्या मुख्याध्यापिका लताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीम.रंजना भांडारकर,श्रीम.मनिषा पाटील,श्री.विरेंद्रसिंह राजपूत,श्री.संभाजी पाटील,श्रीम.सरीता पाटील यांनी उत्कृष्ट नियोजनातून परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.