कचरा फेकल्याच्या कारणावरून माय-लेकावर कुन्हाडीने वार ; आठ जणांविरुद्ध गुन्हा

0

ळगाव : कचरा फेकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका गटाकडून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी कानळदा गावात घडली. यामध्ये टोळक्यातील काहींनी कुन्हाडीने वार करुन मायलेकाला गंभीर जखमी केले असून याप्रकरणी आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा गावात कृष्णा नारायण सपकाळे हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी कृष्णा सपकाळे यांच्या घरासमोर कचरा फेकल्याच्या कारणावरुन मिलींद रविंद्र सपकाळे यांच्यासोबत त्यांचा वाद झाला होता. त्याच भांडणाच्या

कारणावरुन मंगळवारी त्यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली. या वादात मिलींद सपकाळे यांच्यासह आठ जण हे कृष्णा सपकाळे यांच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी कृष्णा सपकाळे यांना लाकडी काठीने मारहाण केली. त्यानंतर मिलींद सपकाळे याने त्याच्या हातातील कुन्हाडीने कृष्णा सपकाळे यांच्या कपाळावर आणि डोळ्यावर वार केले. हा वाद सुरु असतांना त्यांचे भांडण सोडण्यासाठी आलेल्या कृष्णा सपकाळे यांची आई कमलाबाई या त्याठिकाणी आल्या. त्यांना देखील बेदम मारहाण करत त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालीत त्यांना जखमी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.