ऐतिहासिक ऑनलाईन अभिनंदन समारोह संपन्न

0

बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अभिनव अभिनंदन समारोह

बुलढाणा : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या निवडणुकीत आ आप्पासाहेब शिंदे यांची अध्यक्षपदी व अनिलभाऊ नावंदर यांची सचिवपदी तसेच मुकुंदजी दुबे (उपाध्यक्ष), अरुणजी बरकसे (उपाध्यक्ष , वैजिजाथजी जागुष्ठे (कोषाध्यक्ष), प्रसादजी दानवे (सहसचिव), मदनभाऊ पाटील (सहसचिव), अजितजी पारेख (जनसंपर्क अधिकारी) म्हणुन बिनविरोध निवड झाल्याबद्दल आँनलाईन अभिनंदन समारोह आयोजित केला होता.

त्यामध्ये BDCDA च्या वतीने अध्यक्ष राजेंद्रजी नहार यांची MSCDA च्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे ढोलताशांच्या गजरात शब्द सुमनांनी स्वागत केले.

बुलढाणा जिल्हाने घेतलेला आँनलाईन अभिनंदन समारोह हा देशातला पहीला समारोह आहे, असे गौरवोद्गार काढले व असेच येणाऱ्या काळात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन केमिस्ट समाजाने आव्हांनवर मात करण्याचे आवाहन MSCDA चे अध्यक्ष मा श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांनी केले.

बुलढाणा जिल्हाने माझा व सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन, सन्मान केला त्याबद्दल मी जिल्हा संघटना व सर्व केमिस्ट सभासदांचा ऋणी आहे , असे भावनात्मक आभार  MSCDA चे सचिव , केमिस्ट कोहीनुर मा श्री अनिल भाऊ नावंदर मानले.

ज्येष्ठ सभासद , माजी जिल्हाध्यक्ष मा श्री प्रल्हादजी भारंबे साहेब यांनी बुलढाणा जिल्हा चा संघर्षमय  इतिहास वर्णन केला व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

मुकुंदजी दुबे, अरुणजी बरकसे, वैजनाथजी जागुष्ठे, प्रसादजी दानवे, मदनभाऊ पाटील, अजितजी पारेख यांनी अभिनंदन समारोह बद्दल आभार व्यक्त केले व नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुण सभासदांना मार्गदर्शन करण्यात बुलढाणा जिल्हा अग्रेसर असलेल्याचे सांगितले.आँनलाईन अभिनंदन समारोह चे आभार प्रदर्शन BDCDA चे सचिव  गजानन शिंदे यांनी केले. आँनलाईन अभिनंदन समारोहाच्या यशस्वीतेसाठी गणेश बंगळे, सर्व कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.