जळगाव पुन्हा खुनाने हादरले ; तरूणाची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या

0

जळगाव (प्रतिनिधी) । माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या खुनाची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री शिवाजीनगर भागात इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळ जवळ एका 25 वर्षीय तरूणावर टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. भूषण भरत सोनवणे  उर्फ अठ्ठा (३०, रा. इंद्रप्रस्थनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दारूच्या नशेत झालेल्या हाणामारीत हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे

मयत तरुण भूषण हा इंद्रप्रस्थ चौकात अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय २५, रा. शाहूनगर), प्रतीक निंबाळकर (वय २४ रा. शिवाजी नगर) व दुर्गेश आत्माराम संन्यास (वय २६ रा. गेंदालाल मिल) यांच्यासोबत रात्री 11 वाजेच्या सुमारास उभा होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित व मयत हे दारू पिलेले होते. यावेळी किरकोळ वाद होऊन भूषण सोनवणे याने शिवीगाळ करीत प्रतिकच्या कानशिलात मारली. त्याचा राग आल्याने प्रतीक निंबाळकर याने त्याच्याकडील चॉपर काढून भूषणच्या पोटात खुपसला. तसेच मानेवर, मांडीवर वार केले. त्यानंतर अतुल काटकर यानेही त्याच चॉपरने भूषणवर पुन्हा वार करीत त्याला जीवे ठार मारले.

दरम्यान, तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भूषणच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोदविण्यात आला आहे. तपास सहाययक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा करीत असून शिवाजीनगर भागात अजून तणावसदृश्य वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.