एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील 11 दिवसांपासून संप सुरु असूनही शासनाकडून काहीच तोडगा काढण्यात येत नसल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. काल रात्री येथील एसटी आगारात संपावर बसलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली.

एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, स्थानिक आगारा समोरही संप सुरु आहे. दरम्यान एसटी महामंडळाकडून संप मोडीत काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. यामुळे अनेक एसटी कर्मचारी धास्तावले असून निलंबन होण्याच्या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक मेकॅनिक पदावर कार्यरत असलेले विशाल प्रकाश अंबलकार (वय 29, रा. माटरगाव) यांनी काल रात्री विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यात प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना तत्काळ उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अंबलकार यांचेवर स्थानिक सामान्य रूग्णालयात प्रथमोचार करून अकोला रेफर करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.