एरंडोल येथे २८ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलन

0

औदुंबर साहित्य रसिक मंचतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती.
एरंडोल – येथील औदुंबर साहित्यिक रसिक मंच तर्फे दोन दिवशीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन २८ व २९ मार्च २०२० रोजी करण्यात आले आहे.अशी माहिती मंचचे अध्यक्ष advt.मोहन बी.शुक्ला व सचिव advt.विलास मोरे यांनी ९ फेब्रुवारी २०२० रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
   या संमेलनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक विश्वास पाटील हे भूषवतील तसेच संमेलनाचे उद्घाटक म्हणुन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत विधीतज्ञ यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष पदी येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांची निवड करण्यात आली आहे व कार्याध्यक्षपदी प्रविण महाजन यांची निवड करण्यात आली आहे.अशी अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
    विशेष हे कि राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरविण्याचे यजमान पद एरंडोल नगरीला यापुर्वी २००४मध्ये प्राप्त झाले होते.आता दुस-यांदा साहित्य संमेलन भरविण्याचा मान एरंडोल नगरीला मिळाला आहे.
  पत्रकार परिषदेस संमेलनाचे स्वागताध्यक्ष अमित पाटील,औदुंबरचे उपाध्यक्ष अरुण माळी,सचिव advt.विलास मोरे,कार्याध्यक्ष प्रविण महाजन,सहसचिव किशोर पाटील कुंझरकर,सल्लागार जावेद मुजावर आदी उपस्थित होते. 

Leave A Reply

Your email address will not be published.