एरंडोल येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

0

एरंडोल (प्रतिनिधी) येथील आदर्श नगरमध्ये शारदा विवेक पाटील (वय २९) या विवाहितेने छताच्या कळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

सदरमहिलेचा मृतदेह पलंगावर लटकलेल्या स्थितीत दिसून आला. प्रदीप हरिश्‍चंद्र महाजन राहणार नागोबा मढी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर महिला तिच्या पती व मुलाबाळांसह राहत होती. तिचा पती सेवा नुरुत्त फौजी असून ते पगार घेण्यासाठी गेले होते प्रदीप हरीचंद्र महाजन, हे घटनास्थळी गेले असता त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा करून लोक जमले व पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रेत खाली उतरून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केले याबाबत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप चांदेलकर व निलेश ब्राम्हणकर हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.