अभिजित राऊत जळगावचे नवे जिल्हाधिकारी !

0

जळगाव :- सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अभिजित राऊत आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी राहणार आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे.गुरुवारी तात्काळ ते आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे

परिचय

डॉ. अविनाश ढाकणे यांच्या जागी सांगली जिल्हापरिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांची नियुक्ती झाली आहे. श्री. राऊत मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मात्र बुलडाण्यात झाले. 2013 च्या बॅचचे आयएएस असलेले राऊत तरुण व संयमी स्वभावाचे अशी त्यांची ओळख आहे. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली असून, सांगली जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून अडीच वर्षांपासून ते सेवारत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.