एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे महिलेची आत्महत्या

0

एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळकोठा बु! येथे रत्‍नाबाई सुभाष भिल वय२६ वर्षे या विवाहितेने १८ मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घराच्या लाकडी सर्याला लटकलेल्या अवस्थेत या महिलेचे प्रेत आढळून आले. गावातील लोकांच्या मदतीने प्रेत खाली उतरवुन एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

आत्महत्या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे. रत्‍नाबाई भिल ही तिच्या पतीसह पिंपळकोठा बु! या तिच्या माहेरी राहत होती. तिचे मूळ गाव मेहू तालुका पारोळा हे आहे.
याबाबत समाधान सोनवणे यांनी खबर दिल्यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.