खळबळजनक : भाजपचे पदाधिकारी राजेंद्र देसले यांची पत्नी व मुलीसह आत्महत्या

0

जळगाव : एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी व मुलगी यांच्यासह तापी नदीच्या पुलावरून उडी मारत आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र देसले (वय ५४), पत्नी वंदनाबाई देसले (वय ४८) आणि मुलगी ज्ञानल (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तिघांचे नावे आहेत. यातील मुलीसह पित्‍याचा मृतदेह सापडला असून महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

राजेंद्र देसले हे नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्‍ताने गेले होते. कार्यक्रम संपल्‍यानंतर मुक्‍काम करून दुसऱ्या दिवशी ते घरी जातो म्‍हणून नातेवाईकांकडून कारने (क्र. एमएच १९, पीए १०९४) १७ मे रोजी सकाळी भरवस येथून निघाले. मात्र त्‍यांनी धरणगावकडे येण्याचा रस्‍ता सोडून उलट्या दिशेने प्रवास करण्यास सुरवात केली. यानंतर तापी नदीच्या पुलावर गाडी थांबवून त्‍यांनी आत्‍महत्‍या केली.

गाडी दिसल्‍याने आला संशय
दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र ते भोदला पोहचले नाही. यामुळे देसले यांच्या मुलाने नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र बुधवारी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. यामुळे संशय आल्‍याने शोधाशोध सुरू केली. दुपारी चार वाजता राजेंद्र देसले यांचा मृतदेह नदीत तरंगतांना दिसून आले. रात्री उशिरा राजेंद्र देसले व त्‍यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. परंतु, राजेंद्र देसले यांच्या पत्नीचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.