उमेवारी अर्ज रद्द केल्याने तेजबहादूर यादवांची सर्वोच्च न्यायालयात धाव

0

नवी दिल्ली :- बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात तेजबहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्यासोबत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी बीएसएफ अधिकारी तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केला. त्यानंतर शालिनी यादव या समाजवादी पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात मोदी यांना टक्कर देणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.