यज्ञेश्‍वर आश्रमात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

0

भुसावळ :- मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चिंचोल येथील श्री यज्ञेश्‍वर आश्रमात रविवार, दि. १२ ते १९ मे २०१९ दरम्यान श्रीमद् भागवत कथा व अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही वै.ह.भ.प. गुरूवर्य बंकटस्वामी महाराज, वै.ह.भ.प. गुरूवर्य काशिनाथ भाऊ, वै.ह.भ.प. गुरूवर्य श्रीराम महाराज व वै.ह.भ.प. गुरूवर्य भास्कर महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प. सुरेश महाराज तळवेलकर असून दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकडा, सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरीपाठ व रात्री हरीकीर्तन होणार आहे. १२ रोजी दिनेश महाराज चिखली, १३ रोजी ज्ञानेश्‍वर महाराज शेलवड, १४ रोजी भानुदास महाराज टाकळी, १५ रोजी नारायण महाराज भामलवाडी, १६ रोजी कैलास महाराज उमाळी, १७ रोजी महादेव महाराज उस्मानाबाद दिंडोरी, १८ रोजी किशोर महाराज तळवेल यांचे कीर्तन तर १९ रोजी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान सुधाकर महाराज मेहूणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री यज्ञेश्‍वर आश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. गुरूवर्य शारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.