उद्यापासून महाविद्यालये सुरु होणार; जाणून घ्या नियमावली..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे महाविद्यालये देखील बंद करण्यात आली होती, मात्र सध्या कोरोनाची ओसरती लाट लक्षात घेता तसेच  कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करुन राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी मिळणार आहेत. तसेच महाविद्यालयातर्फे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची चाचपणी केली जात आहे. आता सर्व विद्यालयांनी कॉलेज सुरु करण्यासाठीची प्राथमिक तयारी केली आहे. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे.

विद्यापीठ, महाविद्यालये सुरु करण्यासाठीची नियमावली

– विद्यापीठ, महाविद्यालये वर्ग 50% पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

– महाविद्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.

– मास्क घालणे तसेच स्वच्छतेचे शक्य ते सर्व उपाय करणे गरजेचे.

– कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची एक ठराविक वेळ असावी.

–  कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना महाविद्यालयात येण्यास बंदी.

– फक्त लक्षणे नसलेल्या कर्मचारी, विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल.

–  कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लसीकरण केलेले असणे गरजेचे.

– लसीकरण पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लालेसची सोय असेल.

– महाविद्यालय, विद्यापीठातील दुकाने, कॅन्टीन, स्टॉल बंद असतील.

–  विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे.

–  एक बेन्च रिकामा ठेवून विद्यार्थ्यांना बसवलं जाईल.

–  लेक्चरदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सहा ते आठ फुटांचे अंतर असणे गरजेचे.

Leave A Reply

Your email address will not be published.