उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मी पॅकेज घोषित करणारा नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’

0

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते आज कोल्हापूर जिल्ह्यात होते. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली. या पाहणीनंतर दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन आपआपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे असं म्हटलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे, मदत मिळणे आवश्यक आहे, असा टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन, काही उपाययोजना सुचवल्या. मात्र त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणूदेत”

केंद्राकडे पैसे मागणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणतात. पण NDRF च्या नियमानुसार तिकडे नुकसानाची अहवाल पाठवावा लागतो. ही मदत मिळण्याआधी SDRF मधून आपल्याला पैसे खर्च करता येतात. शिवाय NDRF चे निकष मोदी सरकारनेच बदलले. 2015 पर्यंत हे निकष स्थिर होते. इतक्या वर्षात मोदींनीच नियम बदलून, तोकडी मदत दुप्पट केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला.

Leave A Reply

Your email address will not be published.