भाजपा अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शितल देशमुख

0

अमळनेर | प्रतिनिधी

येथील भाजपा माजी शहराध्यक्ष शितल देशमुख यांची अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी नियुक्ती केली आहे. शितल देशमुख यांनी महाविद्यालयीन काळापासून विविध माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. विद्यार्थी हितासाठी सदैव ते कार्यरत असताना त्यानंतर युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी विराजमान झाले होते. पक्षासाठी असलेले कार्य आणि संघटन कौशल्य पाहुन पार्टीने आता त्यांची अमळनेर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांना बढ़तीची भेट दिली आहे. शितल देशमुख यांचा शहरासोबतच ग्रामीण भागात उत्तम संपर्क आणि चांगला अभ्यास असल्याने त्यांच्या रूपाने प्रथमच शहराला या पदाचा बहुमान मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.