उदयनराजे ३२ हजार मतांनी पिछाडीवर ; श्रीनिवास पाटील आघाडीवर

0

सातारा :  राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लक्ष लागलं असताना साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरु आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्याने साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे. शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार उदयनराजे पिछाडीवर असून श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत. उदयनराजे भोसले ३२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

शरद पवार यांची साताऱ्यातील सभा चांगलीच गाजली होती. यामुळे या सभेचा प्रभाव मतदानावर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनी या सभेत बोलताना आपल्याकडून चूक झाली असून चूक मान्य करत असल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे उदयनराजे भोसले यांनी आपला विजय होईल असा आत्मविश्वास अनेकदा व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.