उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम प्र-कुलगुरूपदी प्रा. माहुलीकर

0

प्रतिनिधी, जळगाव
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम प्र-कुलगुरूपदी प्रा. पी. पी. माहुलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपतींनी ही नियुक्ती केली असून, राजभवनातून तसे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.
प्रा. माहुलीकर हे गुरुवारी (दि. १४) पदभार स्वीकारणार आहेत. प्रा. माहुलीकर यांनी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कॉलेज व विद्यापीठ विकास मंडळाच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर मार्च महिन्यापासून ते विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १९९३ मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून त्यांनी ऑर्गेनिक केमिस्ट्री या विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजात त्यांनी अधिव्याख्याता म्हणून सुरुवात केली. १९९४ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रसायनशास्त्र प्रशाळेत पेस्टिसाईड्स व अॅग्रोकेमिकल्स या विषयाचे अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. प्रा. माहुलीकर यांना २३ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी २०११ ते २०१६ पर्यंत काम केले. सांगली जिल्ह्यातील माहुली हे त्यांचे जन्मगाव याच गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विटा ता. खानापूर येथून पदवी आणि शिवाजी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रा. माहुलीकर यांचे १७३ पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या नावावर चार पेटंट असून, पाच पुस्तके प्रकाशित झालेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.