भारतातील पहिल्या डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण 

0

भारतातील पहिल्या डॉ भवरलाल जैन शुद्धपेयजल सयंत्राचे लोकार्पण 

जळगाव, प्रतिनिधी दि –
पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी पाण्यासाठी आयुष्य वेचले. प्रत्येक खेड्यातील जनतेला अत्यल्प दरात पिण्याचे शुद्धपाणी उपलब्ध व्हावे हा त्यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यांच्या 81 व्या जयंतीला आज लोकार्पण करताना मला आनंद होत आहे. जैन इरिगेशनने संशोधनातून विकसित केलेले शुद्ध पेयजल सयंत्र जागतिक पातळीवर पुरस्काराने सन्मानित झाले आहे. असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. हा लोकार्पण सोहळा पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे संघपती सेवादास दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आला. या लोकार्पण प्रसंगी कुरंगीचे सरपंच गजानन पवार, उपसरपंच शेख अमीन शेख हुसेन, अतुल जैन, डी. एम. जैन, गिरधारीलाल ओसवाल, पं. स. समिती सदस्य अनिल महाजन, आनंद गुप्ते, अमर जैन, शशिकांत जैन, विजय जैन, प्रविण जैन, सुरेश जैन, अविनाश जैन, अथांग आणि अभेद्य जैन, विनिल लुनिया (रायपूर), जैन परिवारातील सदस्य, सहकारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अशोक जैन म्हणाले की, ग्रामविकासाच्या प्रत्येक कामात लोकसहभाग, पूर्ण गाव व्यसनमुक्त, एक गाव एक गणपती व देवी ही त्रिसूत्री अवलंबली तर आम्ही कुरंगी हे गाव दत्तक घेऊ अशी घोषणा ही अशोक जैन यांनी केली. विकासाला प्राधान्य देत राजकारण विरहित कामे इथे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करत गावसाठी व्यायामशाळेची उपकरणे देण्याचे ही त्यांनी जाहीर केले. उपस्थित मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात शुद्ध पेयजल योजनेचे प्रातिनिधिक स्मार्ट कार्डचे ग्रामस्थांना मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले. कुरंगी येथील विठ्ठल रुखमाई मंदीर परिसरात आयोजित कऱण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद रापतवार यांनी केले. उदघाटक सेवादास दलूभाऊ जैन यांनी भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.