ई पीक पाहणीला ऑनलाईन सर्व्हरचा खोळंबा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

१५ ऑगस्टपासून शासनाने सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक लागवडीसाठी नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी पोर्टल स्मार्टफोन वर उपलब्ध आहे. त्याचे प्रात्यक्षिक व जनजागृती महसूल विभाग व कृषी विभागाने प्रशासनाने केले नाही.

मात्र बहुतेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नसणे मोबाईल हाताळता येत नसल्याने पोर्टल उघडणे, मोबाईल नेटवर्क नसणे, महिती न भरता येणे, अशा अनेक समस्या शेतकर्‍यांना उध्दवत आहे. सदर पोर्टल उघडता नसल्याने शेतकऱ्यांची जास्त ओरड येत आहे. तलाठी व कृषी अधिकारी हे देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत नाहीत. तरी देखील धार परिसरात अत्यंत मोजक्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन पध्दतीने पीक पेरा नोंदणी केली असून ऑनलाईन नोंदणी करताना येणाऱ्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका अध्यक्ष रवि पाटील यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.