इस्रायल भारताला देणार कोरोनावरील लस बनवण्याची टेक्निक

0

इस्रायलमधील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला असून आता फक्त क्लिनिक चाचण्य़ांमधून काय समोर येते त्याची प्रतिक्षा आहे” असे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का म्हणाले. आम्ही ही सर्व माहिती जगासोबत शेअर करु’ असे रॉन मल्का यांनी सांगितले. याचाच अर्थ भारतालाही लस निर्मितीची सर्व माहिती मिळणार आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

करोनामुळे भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश अधिक जवळ आले असून Covid-19 चा कसा सामना करायचा? याबद्दलचे अनुभव परस्परांना शेअर करत असतात” असे मल्का यांनी सांगितले.

इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. अँटीबॉडी व्हायरसवर हल्ला करुन व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांना दिली. ‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवले असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे’ असे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले. ‘ज्युंची कल्पकता आणि हुशारीमुळे हे साध्य झाले’ असे बेन्नेट म्हणाले.

अ‍ॅंटीबॉडी आधारीत लसीच्या उंदरावर चाचण्या सुरु केल्याची माहिती मागच्या महिन्यात IIBR ने दिली होती. ही इन्स्टिट्यूट करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मांचे सुद्धा कलेक्शन करत आहे.

मिगव्हॅक्स ही इस्रायलमधली संशोधकांची दुसरी टीम सुद्धा करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्याजवळ पोहोचली आहे. इस्रायलने आतापर्यंत चार लाख ४ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. त्यात १६,२४६ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. करोनामुळे इस्रायलमध्ये आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला

Leave A Reply

Your email address will not be published.