गुलाबराव देवकर यांना परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

0
जळगाव, प्रतिनिधी ;- राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणूका आल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने माजीमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी व विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे.
या मागणी निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर हे पक्षाचे एकनिष्ठ सेवक आहेत.जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री असतांना जळगावसह खान्देशात त्यांनी पक्ष वाढीसाठी भरीव असे कार्य केले आहे. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तम काम करणारा मंत्री असा नावलौकिक आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी मिळवला होता. आप्पासाहेबांनी मंत्रीपदी असतांना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणला होता व त्यातून विविध प्रकारची विकास कामे शरदचंद्रजी पवार व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहेत.शरद पवार यांच्या समाज कार्याचा विचार जपत पक्षाच्या व देवकर फेडरेशच्यावतीने त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संपवण्याच्या वल्गना करणा-यांना सडेतोड उत्तर देत पक्षाचे सहा आमदार निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आहे. गुलाबराव देवकरांनी पक्षाने, अजित पवार ,जयंत पाटील यांनी वेळोवेळी जी जबाबदारी दिली ती निष्ठेने सांभाळली आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या काळात जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला संघटीत करून कुठल्याही तालुका व जिल्हास्तरावरील नेत्यांला व कार्यकर्त्यांना आप्पासाहेबांनी पक्षांतर करू दिले नाही, त्यांना संघटीत करत, बळ देत निवडणूकीसाठी एकदिलाने लढाईसाठी उभे केले.
राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणूका आल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने गुलाबराव देवकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी व विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शहरासह जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यात जळगाव महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, धरणगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील, जळगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख लिलाधर तायडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष मंगलाताई पाटील, ग्रामीण तालुकाध्यक्ष बापू परदेशी धरणगाव तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, जळगाव महिला शहराध्यक्ष ममता  सोनवणे, मजूर फेडरेशनचे संचालक पुरुषोत्तम चौधरी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार,अजय सोनवणे, रोहिदास पाटील , सुजित शिंदे, सुनील पाटील, डी.डी.पाटील, सुभाष माने, गोकुळ चव्हाण नवल पाटील मधुकर चव्हाण हेमंत पाटील नवल पाटील, धवल पाटील आदी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.