इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसीटी तर्फे प्लास्टिक मुक्ती चा संदेश

0

 वक्तृत्व स्पर्धतील विजेत्यांना पारितोषिक 

भुसावळ दि 1 –

डिस्ट्रिक 303 मध्ये नुकतेच नव्याने स्थापन झालेल्या व आपली ओळख निर्माण करणाऱ्या इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसीटी तर्फे एन. के.नारखेडे स्कूल मध्ये विध्यार्थी करिता प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत

” प्लास्टिक चे दुष्परिणाम आणि त्यावर उपाय” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत शाळेतील सुमारे 1500 विद्यार्थी  सहभागी झाले होते .यापैकी 17 विध्यार्थीनी अंतिम फेरी पर्यंत मजल मारली व त्यातून  सहा विद्यार्थ्यानी वक्तृत्व स्पर्धेत  पारितोषिक पटकावले .या विजयी विद्यार्थ्याना  क्लब तर्फे पारितोषिक देण्यात आले.

प्रसंगी हा प्रोजेक्ट येणाऱ्या पुढील काळात अहिल्यादेवी कन्या शाळा,भुसावळ हाई स्कूल व भालचंद्र धोंडू पाटील या तीन शाळेत घेण्यात येणार असल्याचे  नूतन अध्यक्ष डॉ.सौ.मृणाल पाटील यांनी यावेळी  सांगितले.

कार्यक्रम (प्रोजेक्ट ) यशस्वीतेसाठी   क्लब च्या अध्यक्षा डॉ.सौ मृणाल पाटील, सचिव सौ मोना भंगाळे,प्रोजेक्ट चेरमन सौ रेवती मांडे,आई. पी.पी सौ सुनीता पंचपांडे,सौ पल्लवी वारके, सौ सीमा सोनार,सौ हेमलता सोनार,सौ अनिता महाजन,सौ अदिती भडंग यांनी परिश्रम घेतले व शाळेच्या प्राचार्या सौ कोमल कुलकर्णी व शिक्षकवृंदानीं सहकार्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.