इंधन दरवाढीविरोधात पाचोऱ्यात शिवसेना व युवासेनातर्फे रास्तारोको

0

पाचोरा ( प्रतिनिधी ) :- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे.निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रूपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा प्रयत्न असल्याची  टिका आ.किशोर (आप्पा) पाटील यांनी यावेळी केली.

सरकारने इंधनदरवाढ करून सर्वसामान्यांची लूट चालवली आहे. राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवर विविध कर आणि सेस लावले आहेत त्यामुळे गोवा कर्नाटक या शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर खूप जास्त आहेत. या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार असून सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे.

सरकारने पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून तात्काळ इंधनाच्या किंमती कमी करण्याची मागणी पाचोरा शिवसेना व युवासेना पक्ष करित असून असे मतं शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी मांडले असुन या मागणीसाठी आज जारगाव चौफुली येथे कार्येकर्तेंच्या मोठ्या संख्येने रास्ता रोको करण्यात आले.
यावेळी जि.प सदस्य रावसाहेब पाटील,पदमसिंग पाटील,भुरा आप्पा,अॅड.दिनकर देवरे, तालुकाप्रमुख शरदभाऊ पाटील,शहरप्रमुख किशोर बारवकर,प्रा.गणेश बापु, पप्पु राजपुत,भरत खंडेलवाल,डाॅ.भरत पाटील,नगरसेवक बापु हटकर,रामसेठ केसवाणी,गंगाराम पाटील,आनंद पगारे,स्विय सहाय्यक राजू पाटील,प्रविण पाटील,पप्पुदादा जाधव,अशोक दत्तु,जितेंद्र पेंढारकर,विशालजी राजपुत,युवासेना शहरप्रमुख संदिप राजे,अनिकेत सुर्यंवंशी,वैभव राजपुत,मनोज पाटील,महेश पाटील,गणेश चौधरी,सागर पाटील,सुरज पाटील,राहुल महाजन,भुषण पाटील,प्रशांत पाटील,समाधान पाटील,उमेश पेंढारकर,संदिप सिसोदिया,विजय भोई,राजेन्द्र पाटील,जावेद शेख,भरतसिंग पाटील,अनिल पाटील,बापुराव,नंदु शेलार,मुन्ना चौधरी,रूपेश पाटील व दादा जगताप व बंडु चौधरी, संदिप पाटील हे सर्व पदाधिकारी आणि कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.