इंधन दरवाढीने ग्राहकांचे मोडले कंबरडे ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

0

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रचंड वाढल्याने मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ३२ वेळा दरवाढ केली आहे. दरम्यान, आज सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यापूर्वी काल रविवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली होती.

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 31 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पेट्रोल 8.06 आणि डिझेल 8.17 रुपयांनी महागले आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

जळगाव : पेट्रोल- 105.74, डिझेल 96.07

मुंबई: पेट्रोल- 104.56, डिझेल 96.42

पुणे: पेट्रोल- 104.15, डिझेल 94.54

नाशिक: पेट्रोल- 104.91, डिझेल 95.27

औरंगाबाद: पेट्रोल- 105.80, डिझेल 97.66

कोल्हापूर: पेट्रोल- 104.66, डिझेल 95.06

 

Leave A Reply

Your email address will not be published.